बेळगाव शहरातील प्रमुख आरपीडी कॉर्नर सध्या ट्राफिक जामचा सापळा बनत चालला आहे. या चौकात सिग्नलची व्यवस्था नाही आणि रहदारी पोलीस नसल्यामुळे नेहमीप्रमाणे येथे गर्दी होऊ लागली असून अडकलेल्या कोंडीतून सुटका करून घेण्याची परिस्थिती स्वतः नागरिकांवर येत आहे.
काल पोलीस नसल्यामुळे अडकलेले ट्राफिक नागरिकांनी सोडवले, त्यामुळे ऑटोरिक्षा चालक व इतर नागरिकानी साथ दिली, यानंतर रहदारी मोकळी होऊ शकली ,एका ठिकाणी बारा ते पंधरा पोलीस थांबलेले असतात , पण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोलीस नसतात यामुळे पोलिसांची नितांत गरज असलेल्या त्या ठिकाणी गैरसोय होत असून याकडे पोलिस दलाने लक्ष देण्याची गरज आहे .
आरपीडी कॉर्नर कडून कॉलेजला जाणाऱ्या मुलांची गर्दी असते, याचबरोबर नोकरदार आणि इतर नागरिक प्रवास करतात अशा वेळी या कॉर्नरवर योग्य रहदारी व्यवस्थापन करण्याची गरज आहे. मात्र तसे होत नाही .पूर्वी या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र ते बंद पडले आहेत.
सिग्नल बंद झाल्यानंतर काही दिवस पोलिस व्यवस्था पाहत होते मात्र पोलीस थांबायचेही बंद झाले असून रहदारीच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात त्यांची सोडवणूक वेळीच होण्याची गरज आहे.