अद्याप उमेदवारीची अधिकृतपणे घोषणा झाली नसताना विद्यमान खासदार सुरेश अंगडी सकाळी अनेकांना चहा पाजवत आहेत वर्तमान पत्रातून जाहिराती देत आहे सभा बैठकातून लोकसभेत मलाच मतदान करा असे आवाहन करत आहेत मात्र दुसरीकडे अनेक इच्छुकांनी भाजप उमेदवारी साठी जोरात लॉबिंग सुरू केली आहे.
वकील अनिल कुमार मुडवाळमठ यांनी भाजप कडून तिकीट देण्याची मागणी केली आहे.ग्रामीण भाजप अध्यक्ष बैलहोंगलचे माजी विश्वनाथ पाटील यांना वकिलांनी निवेदन देऊन तिकिटाची मागणी केली आहे. ए वाय मूडवाळमठ हे वकील संघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सामाजिक इतर क्षेत्रात मोठं योगदान दिले आहे. खासदार सुरेश अंगडी यांनी सामान्य जनतेसाठी एकही काम केलेले नाही गेल्या पंधरा वर्षात बेळगावचा विकास खुंटला आहे त्यामुळे यावेळी उमेदवार बदला अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
राष्ट्रीय किसान मोर्चा अध्यक्ष शंकर गौडा पाटील, माजी खासदार अमरसिंह पाटील,माजी आमदार संजय पाटील आदींनी उमेदवारी साठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.विद्यमान खासदार अंगडी यांनी तीन वेळा निवडून येणे या गोष्टीवर आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या माध्यमातून उमेदवारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.राज्य सभा सदस्य कोरे यांचे नाव देखील चर्चेत आहे.
‘अजून अधिकृत तिकीट जाहीर झाले नसताना विकास पुस्तिकेत स्वतःला 2019 चा लोकसभा उमेदवार म्हणून अंगडी स्वताला प्रोजेक्ट करत आहेत उमेदवारी मिळवण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत असा देखील आरोप एका भाजपमधील इच्छुकांने केलाय.
अद्याप राज्य कार्यकारिणीने कुणाचेच नाव सेंट्रल इलेक्शन कमिटीकडे पाठवले नाही 15 मार्च रोजी बेळगावातील उमेदवारी ठरवण्यासाठी बंगळुरूत महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत चर्चा करून दिल्लीला इच्छुकांची नावे पाठवली जाणार आहेत अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.
ज्या लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडुन येऊ शकतो तेथून एक इच्छुकांचे नाव तर ज्या ठिकाणी संभ्रम आहे त्या ठिकाणी हुन दोन किंवा तीन संभाव्य इच्छुकांची नावे दिल्ली भाजप सेंट्रल निवडणूक कमिटीकडे पाठवली जाणार आहेत. त्या नंतर 18 मार्च पर्यंत सी ई सी आणि संसदीय समितीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.