बेळगाव शहरात अनेक फोरम आहेत. पण स्वतःला प्रोफेशनल समजणारा एक फोरम असून त्यांनी एकवेळ शेतकऱ्यांवर अन्याय करा पण बेळगाव शहराच्या बाजूने रिंगरोड कराच असे निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे
भारताचा मुख्य व्यवसाय शेती असताना हा व्यवसाय धोक्यात घाला असा अव्यवसायिक निर्णय घेणारा फोरम प्रोफेशनल कसा काय असू शकतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(File फोटो :प्रस्तावित रिंग रोड)
रिंगरोड ही गरज आहे पण मागील 25 वर्षांपासून हा रिंगरोड फक्त शेतकऱ्यांनी विरोध केल्याने होत नाही. आत्ताही तोच इतिहास परत पुनरावृर्ती होत आहे, यावर विचार करून व्यावसायिक दृष्टीने विचार होऊन हा रिंगरोड करावाच असे निवेदन त्या प्रोफेशनल फोरम ने दिले आहे.
शहरातील रहदारीची समस्या सुटल्या शिवाय शहर स्मार्ट होऊ शकत नाही त्यामुळं शहराला स्मार्ट करण्यासाठी रिंग रोडची नितांत गरज आहेअसेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.