शिक्षकांच्या बदलीचा घोळ संपता संपत नाही. त्यामुळे अनेकांची गोची निर्माण होते. यामुळे शिक्षकाच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने केल्यास सोईस्कर होणार आहे. यासाठी बदली झालेल्या शिक्षक यांना मोबाइल वर मेसेज पाठवून माहिती देण्याची गरज आहे
शिक्षण विभाग हायटेक प्रक्रिया राबवत असला तरी अजूनही बदलीचा घोळ कायम आहे. त्यामुळे अनेकांना या घोळाचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर जिल्ह्यातर्गत बदलीचा अर्ज भरतेवेळी ओटीपी क्रमांक शिक्षकांच्या नावचा अर्ज भरून घेतल्यास ते सोईस्कर होणार आहे
मागील वेळी हजारो शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र बदल्यांचे पत्रक शिक्षण खात्यात किंवा घरी पाठविण्यात आल्याने चांगलाच गोंधळ माजला होता. त्यामुळे कुणाची बदली कोठे झाली हे कोणालाच समजत नव्हते. त्यामुळे आता बदलीचे मेसेज मोबाईल वर पाठविल्यास होणारा घोळ थांबविता येणार आहे.
जर ओटीपी क्रमांक समाविष्ट केला नाही तर त्यांचा अर्जच रद्द ठरविण्यात यावे त्यामुळे होणाऱ्या चुका थांबविता येणार आहेत. याचबरोबर शिक्षकांनी केलेला अर्जाचा पुरावाही त्यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने ही प्रक्रिया राबविल्यास बदल्यामधील होणारे घोळ थांबविण्यास मदत मिळणार आहे.