लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बेळगाव ला आलेले असताना त्यांनी नरगुंदकर भावे चौकात भाषण केले. आणि बेळगाव कर्नाटकातच राहू द्या असे उद्गार काढले होते. अशी माहिती एका कार्यक्रमात खासदार सुरेश अंगडी यांनी दिल्यामुळे गोंधळ झाला आहे. यासंदर्भात वर्तमानपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अंगडी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकावर काल एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांचे फोटो लावा तसेच लोकमान्य टिळकांचा सुद्धा फोटो लावा असा आदेश खासदार अंगडी यांनी काढला.
लोकमान्य टिळकांचा फोटो लावण्याचे कारण म्हणजे ते एक चांगली व्यक्ती होती आणि त्यांनी बेळगाव कर्नाटकात राहू द्या असे म्हटले होते असे अंगडी यांनी सांगितल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. लोकमान्य टिळकांबद्दल च्या या गोष्टीला इतिहास साक्ष आहे अशी पुष्टीही खासदारांनी यांनी या कार्यक्रमात दिली आहे. यामुळे हा इतिहास कुठला असा प्रश्नही गंभीर बनला असून त्याची चर्चा बेळगाव शहरात जोरात सुरू आहे. लोकमान्य टिळक हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जातात.
ब्रिटिशांना डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न त्यांनी केला होता .आज टिळक नाहीत मात्र त्यांच्या नावाने चुकीची विधाने पसरवणाऱ्या व्यक्तींची डोकी ठिकाणावर आहेत का ?असा प्रश्न आता बेळगावची जनता विचारत आहे.