Sunday, April 28, 2024

/

झाड नावग्याच्या जवानावर मंगळवारी होणार अंतिम संस्कार

 belgaum
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 117 व्या बटालियनमध्ये कार्यरत झाड नावगा (ता. खानापूर) येथील राहुल वसंत शिंदे (वय- 24) या जवानाच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी नऊ च्या दरम्यान अंतिम संस्कार केला जाणार आहे.
सोमवारी सायंकाळी कोलकाता हुन त्याचे पार्थिव विमानाने बंगळुरुला आणण्यात आले होते त्या नंतर बंगळुरू हुन रस्त्याच्या  मार्गाने लष्करी गाडीतून खानापूरला आणले जाणार आहे. सकाळी सहा वाजता खानापूर ला पार्थिव पोचणार असून नऊ वाजताच्या दरम्यान झाड नावगा येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार केला जाणार आहे.
रविवारी सकाळी 6 वाजता पश्चिम बंगाल सीमेवर झालेल्या गोळीबारात हुतात्म्य प्राप्त झाले होते. पश्चिम बंगाल मध्ये राहुल हा बीएसएफ मध्ये  सेवेत होता. यावर्षीच त्याचा विवाह जमला होता, सुट्टीचे नियोजन करून येत्या एप्रिल किंव्हा मे मध्ये त्याचा विवाह करण्यात येणार होता पण त्यापूर्वीच दुर्दैवीपणे तो शहीद झाला आहे.त्याचा भाऊ विवाहित असून तो ही लष्करात आहे. आई वडील शेतकरी आहेत.रविवारी पासून झाड नावगे गाव आणि खानापूर तालुक्यात वर शोककळा पसरली आहे.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.