कडोली येथील मास्टर प्लॅन विरोधात न्यायालयातून स्टे आणण्यात आले असताना शुक्रवारी मात्र सकाळपासून कडोली गावात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता गावचा विरोध पत्करून घरे हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार की न्यायालयाचा आदेशानुसार पोलीस परत जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कडोली ग्राम पंचायतचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असताना पोलीस दडपशाहित मास्टर प्लॅन राबिविण्यात येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी पोलिसांनी दडपशाही केल्याची घटना घडली होती. आता शुक्रवारी परत पोलिसांचा ताफा कडोली येथे दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे
आपला मनमानी कारभार करत ग्राम पंचायतमधील काहींनी हा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू करणार असल्याचे दिसून येत आहे. विरोध करणाऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून आपला मनसुबा पूर्ण करून घेण्याची तयारी सध्या कडोली गावात सुरू असून आज सर्व घरे पाडविण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.
ज्यांनी विरोध केला आहे त्यांना 5 मार्च रोजी नोटिसा पाठविण्यात आल्या असून 6 रोजी तुमची घरे खाली करा असा आदेश देण्यात आला. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अजब कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मास्टर प्लॅनचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.