जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना दुसरीकडे अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्या मोटारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी टंचाईत आणखी भर पडल्याचे दिसून येत आहे. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाय योजना राबविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यात तीन तालुक्यांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र आता दुष्काळी झळ सर्वच तालुक्याना बसत आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण्यासाठी प्रशासन आतापासून कामाला लागले आहे. मात्र काही ठिकाणी अवैध पाणी उपसा करण्यात येत असल्याने काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र काहीजण याचा दुरुपयोग करत असल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून बेकायदेशीररित्या पाणी उपसा करून अनेकांना उपाशी ठेवण्याची वेळ आली आहे. मागील दोन वर्षांपूर्वीही अशाच घटना घडल्या होत्या त्यावेळी मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या.
दुष्काळी भागात अनेक गावे तहानलेली आहेत. त्यांना कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र कालव्यातील पाणी इतर ठिकाणी वापरण्यात येत असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत याचा विचार करून अवैध मिटर जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.