आगामी लोकसभा निवडणूकीत बेळगाव लोकसभा मतदार संघातून जिंकणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल असे मत वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडले आहे.
शनिवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात के डी पी बैठकीत सहभाग घेतल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की राज्यातील सर्व मतदार संघातील उमेदवार ठरवण्यासाठी रविवारी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीची बैठक होत आहे त्यावेळी सर्व मतदार संघातील जगाबाबत चर्चा केली जाईल.
रामदुर्ग मध्ये व्हाट्स अप ग्रुप फेस बुक वर पाकिस्तान जिंदाबाद घोषणाबाजी केलेल्याची चौकशी सुरू असून पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा आहे पोलिसांना दोषींवर कारवाई करा अश्या सूचना दिल्या आहेत असे ते म्हणाले.
निवडणूक जवळ आली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह भाजपला सगळे जण विरोधक वाटतात असा टोला भाजपला लगावत पुलवामा प्रकरणी अद्याप तरी राजकारण झाले नाही मात्र पूढे बघू असे देखील ते म्हणाले.