Friday, April 19, 2024

/

‘दक्षिण काशीचं मंदिर सजलं’

 belgaum

बेळगाव शहराच्या इतिहासात भर घालणाऱ्या ख्यात अश्या कपिलेश्वर मंदिराची सजावट करण्यात आली आहे.डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट खास महा शिवरात्री निमित्त केली असून कपिलनाथ मंदिराला बाहेरून राजवाड्याच्या लूक देण्यात आलाय.

Kapileshwar temple

मध्यवर्ती भागात वसलेले हे कपिलेश्वर मंदिर शेकडो वर्ष जुने असून दक्षिणेतील काशी म्हणून ख्यात आहे खास करून श्रावण सोमवार आणि महाशिव रात्रीला ला मंदिरात बेळगाव सहा हुबळी गोवा आणि महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.

 belgaum

कोणीही काशीचे दर्शन घेवून बेळगावला परतले कि कपिलेश्वरचे दर्शन घेतल्या शिवाय घरी जात नाहीत अशी इथली खास परंपरा आहे. सोमवारी देखील लाखो भाविकांनी शिवदर्शन घेतील अशी अपेक्षा आहे.

Kapileshwar temple

या वर्षी शिवरात्री निमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवारी मध्यरात्री 12 वाजता महा अभिषेक सुरू होणार असून सोमवारी पहाटे 5 वाजता अभिषेक घातला जाणार आहे या नंतर महा आरती महापूजा आयोजित केली आहे.या निमित्ताने मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले असणार आहे मंगळवारी 11 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वितरित केला जाईल.

आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजले असून आगामी दोन दिवसांत सभा मंडपात पूर्ण फुलांनी सुशोभीकरण केले जाणार आहे अशी माहिती मंदिर ट्रष्टी अभिजित चव्हाण यांनी बेळगाव Live कडे बोलताना दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.