निवडणुकी निमित्त काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू असताना नगरसेविका सरला हेरेकर यांना अडवण्याचा फटका माजी आमदार फिरोज सेठ यांना महागात पडला. सरला ताईंनी सेठ यांना फटकारल्याने त्यांना गप्प बसावे लागले.
या बैठकीत सरला हेरेकर यांच्याकडे बघून इथे फक्त काँग्रेसच्या नेत्यांनी थांबा, बाकीच्यांनी निघून जा असे राजू सेठ यांनी बोलल्यामुळे सरला ताई भडकल्या. मी कॉंग्रेसचीच आहे आणि सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाने काम करत आहे. तुम्ही मला बाहेर काढू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
यावर भाजप नेते कोरे यांच्याबरोबर तुम्ही प्रचार करता. मागील विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही तुम्हाला सदाशिव नगर मध्ये भाजप चा प्रचार करताना बघितले असा आरोप सेठ यांनी केला, मात्र सरला हेरेकर यांनीही पलटवार करून तुम्ही सुद्धा दोन दिवसांपूर्वी कोरे यांच्यासोबत बैठक केला आहात, की मग तुम्ही कसे काय येथे असे विधान केले.
वन मंत्री सतीश जारकीहोळी किंव्हा इतर कुठल्याच काँग्रेस नेत्याने या वादात तोंड घातले नाही. यामुळे सेठ यांनाच माघार घ्यावी लागली.
माजी आमदार रमेश कुडची यांच्या कम बॅक ने आलेल्या नाराजीतून असा वाद मुद्दाम उकरून काढण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे.