बेळगाव शहराच्या बाजूनेच रिंग रोड करा अशी मागणी करून रिंग रोडला संतीबस्तवाड ग्रामस्थांची परवानगी आहे अशी चुकीच्या माहिती देणाऱ्या प्रोफेशनल फोरमचा निषेध संतीबस्तवाड येथील शेतकऱ्यांनी केला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे आंदोलन करत प्रोफेशनल फोरमच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
4 मार्च रोजी प्रोफेशनल फोरम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संतीबस्तवाड येथील शेतकऱ्यांनी रिंग रोड करण्यास संमती दर्शवली होती अशी चुकीची माहिती निवेदना द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. संती बस्तवाड गावच्या सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सुपीक जमीन बळकावण्यास विरोध केलाय या गावच्या कोणत्याही शेतकऱ्यांने रिंग रोड करण्यास परवानगी दिली नाही.
अगोदरच आमच्या गावाला कमी सुपीक जमीन आहे त्यातच व्ही टी यु साठी जमीन बळकावण्यात आली आहे त्यामुळं कोणत्याही स्थितीत आम्ही एक इंच देखील जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
चुकीची माहिती देणाऱ्या प्रोफेशनल फोरम वर बंदी घाला आणि संस्थेच्या सर्व सदस्यांवर कायदेशीर कारवाई करा अशी देखील मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यावेळी वकील पी डी सडेकर,एक्स जे गोंचालव्हीस, बाळासाहेब पाटील,प्रहलाद लोहार आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.
एकवेळ शेतकऱ्यांवर अन्याय करा पण बेळगाव शहराच्या बाजूने रिंगरोड कराच असे निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते त्यावर शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी या संघटनेवर बंदीची मागणी केली आहे.
भारताचा मुख्य व्यवसाय शेती असताना हा व्यवसाय धोक्यात घाला असा अव्यवसायिक निर्णय घेणारा फोरम प्रोफेशनल कसा काय असू शकतो अशी भूमिका देखील शेतकरी मांडत आहेत.