संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चिकोडी लोकसभा मतदार संघातील भाजपचे तिकीट जाहीर झालं असून माजी खासदार रमेश कत्ती यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तर निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांचे पती अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
चिकोडी सह कर्नाटकातील तीन जागा सह भाजपची 12 वी यादी भाजप महासचिव जे पी नड्डा यांनी जाहीर केलं आहे.बेळगाव जिल्ह्यात कत्ती बंधूचे भाजपा मधील भाजप मधील वर्चस्व कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बेळगाव जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या प्रभावी नेत्याच्या दबावाखाली हा येऊन हाय कमांड हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या चिकोडी मतदार संघातील रमेश कती यांना तिकीट नाकारल्याने जिल्ह्याची राजकारनात फार मोठे परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत आहे.रमेश कत्ती आणि त्यांचे मोठे बंधू उमेश कत्ती यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ आहे त्याच बरोबर डी सी सी बँक सारखी मोठी अर्थिक सत्ता असणारी बँक आणि दोन साखर कारखाने आहेत जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व आहे.
कत्ती बंधू हे भाजप हाय कमांड ने तिकीट नाकारलं म्हणून पक्ष विरोधी हालचाली गतीमान होणार असून भाजपला हा निर्णय सेट बॅक ठरणारा आहे.या घटनेमुळे बेळगाव जिल्हा भाजप मधील कोरे आणि कत्ती यांच्यातील मतभेद अधिक गडद झाले आहेत.