सीमा सुरक्षा दल म्हणजे बी एस एफची तुकडी बेळगावात दाखल झाली असून सोमवारी या तुकडीने पथसंचलन देखील केलं आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शहर आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बी एस एफ तैनात केले जाणार आहे.
सध्या बेळगाव शहरात बी एस एफ ची एक तुकडी दाखल झाली असून या तुकडीने स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्तर भागातील ए पी एम सी पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात परेड केली आहे.शहरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंदा बी एस एफ तैनात असणार आहे .
आज एक तुकडी दाखल झाली आहे आगामी काही दिवसात आणखी दोन तुकड्या येतील आणि 27 एप्रिल पर्यंत बेळगावात रहातील अशी माहिती पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.
ए पी एम पोलीस स्थानक परिसरात पथसंचलन करताना मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी,ए सी पी चंद्रप्पा आदींनी भाग घेतला होता.बेळगाव शहरातील इतर संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात उद्या पासून पथ संचलन सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे.