एकेकाळी दहशतवादी आणि घुसखोरांना आश्रय देणारे बेळगाव शहर आता पुन्हा रडारवर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बेळगावमध्ये याबाबत अजून पोलीस प्रशासन पुरेसे कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात घेऊन दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे
पाकिस्तान मधील हवाई हल्ला आणि त्यानंतर पुन्हा होणारी घुसखोरी याचा विचार करून संपूर्ण देशात हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. याचा बेळगाव पोलिसांनी विचार करून दक्षता घ्यावी असे मत अनेकातून व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव हे दहशतवादी संघटनांचे केंद्रबिंदू असल्याचे याआधीही उघड झाले होते. त्यामुळे येथे अनेक कारवाया झाल्या आहेत. अनेक माओवादी दहशतवादीना बेळगावातुन अटक करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव हे दहशतवादी संघटनांशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संबंधित असल्याचे दिसून आले आहे याचा विचार करून पोलिसांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहेत. याचा सूड भारताने घेतला असला तरी दहशतवादी कारवाया अजूनही सुरूच आहेत . त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष करून पर्यटन स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.