Monday, January 20, 2025

/

‘जी एस एस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन’

 belgaum

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी या संस्थेला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या संस्थेच्या वतीने चालविल्या जात असलेल्या जी एस एस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी करून महाविद्यालयामध्ये एक बैठक घेण्यात आली.

संस्थेच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संबंध पुनर्प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेची 75 वी साजरी करण्याच्या अनुषंगाने माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नवीन विधायक आणि विद्यार्थ्यांना उपयोगी उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

जी एस एस महाविद्यालयाची वाटचाल अतिशय योग्य प्रकारे होत असून आत्तापर्यंतच्या सर्व मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाने सातत्याने’अ’ श्रेणी संपादन केली आहे. समाजाच्या शैक्षणिक, औद्योगिक, वैज्ञानिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी सभासद व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आजवर नोंदणी केलेल्या किंवा न केलेल्या अशा सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा 1) प्रा. भरत तोपिनकट्टी -944 88 75 429, डॉ.संदीप देशपांडे -940 36 0 0 796 ,अनंत लाड -944 83 57 544

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.