बेळगाव शहराच्या इतिहासात भर घालणाऱ्या ख्यात अश्या कपिलेश्वर मंदिराची सजावट करण्यात आली आहे.डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट खास महा शिवरात्री निमित्त केली असून कपिलनाथ मंदिराला बाहेरून राजवाड्याच्या लूक देण्यात आलाय.
मध्यवर्ती भागात वसलेले हे कपिलेश्वर मंदिर शेकडो वर्ष जुने असून दक्षिणेतील काशी म्हणून ख्यात आहे खास करून श्रावण सोमवार आणि महाशिव रात्रीला ला मंदिरात बेळगाव सहा हुबळी गोवा आणि महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.
कोणीही काशीचे दर्शन घेवून बेळगावला परतले कि कपिलेश्वरचे दर्शन घेतल्या शिवाय घरी जात नाहीत अशी इथली खास परंपरा आहे. सोमवारी देखील लाखो भाविकांनी शिवदर्शन घेतील अशी अपेक्षा आहे.
या वर्षी शिवरात्री निमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवारी मध्यरात्री 12 वाजता महा अभिषेक सुरू होणार असून सोमवारी पहाटे 5 वाजता अभिषेक घातला जाणार आहे या नंतर महा आरती महापूजा आयोजित केली आहे.या निमित्ताने मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले असणार आहे मंगळवारी 11 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वितरित केला जाईल.
आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजले असून आगामी दोन दिवसांत सभा मंडपात पूर्ण फुलांनी सुशोभीकरण केले जाणार आहे अशी माहिती मंदिर ट्रष्टी अभिजित चव्हाण यांनी बेळगाव Live कडे बोलताना दिलीय.