रविवारी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली आणि त्या वेळे नंतरच देश भरात निकडणुकीची आचार संहिता लागू झाली. आचार संहिता लागू झाली असताना विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांचे फोटो अनेक सरकारी कार्यालयावर झळकत आहेत.
बेळगाव शहर रेल्वे स्थानकावर वाय फाय सुरू केलेला फ़लक आणि काडा ऑफीस समोरील सरकारी कार्यालया वरील फलक अजून हटवण्यात आला नाही.रेल्वे स्थानकावर मोफत वाय फाय सुरू आहे की नाही याबाबत साशंकता आहे मात्र ऐन आचार संहितेत देखील तो फलक झळकत आहे.
निवडणुक जाहीर होऊन अवघे 72 तास उलटले नसून येळळूर सारख्या ग्रामीण भागातील शिवसेनेचे शाखेचा फलकाला झापण्यात धन्यता मानणाऱ्या निवडणुक आयोगाला बेळगांव रेल्वे स्थानकावरील हा बोर्ड कसा दिसला नाही ह्याची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.सदर फलक काढण्याची किंवा झाकण्याची जबाबदारी रेल्वे खात्याची आहे रेल्वे प्रशासन देखील झोपी गेलंय की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
एकीकडे येळ्ळूर येथील शिवसेना शाखेचा फलक झापला जातो मात्र विद्यमान खासदार महोदयांचे फलक अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का?असा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.बेळगांव मध्ये येनकेन प्रकारे मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्या प्रशासन बरोबर निवडणुक आयोग सुद्दा मराठी ची गळचेपी करण्यात पुढे आहे असच खेदान म्हणाव लागेल अशी प्रतिक्रिया उमटत आहे.