भारतीय सैन्य दलात कर्नल पदांवर असलेल्या पतीचे अकाली निधन झाल्यानंतर साहसी अश्या बेळगावच्या कन्येने साहस जिद्द चिकाटीच्या जोरावर लेफ्टनंट ही पदवी प्राप्त करत भारतीय सैन्य दलात रुजू होत आहे. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग सेंटर मध्ये सहा महिन्यांचे अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण करत तिने बेळगावचे नाव उज्वल केलं आहे.
तिच्या “दुःखा”ला आनंदाच्या आणि जिद्दीच्या यशाची किनार लाभली आहे.
चेन्नई येथील सैन्य अधिकारी प्रशिक्षण केंद्रात यावर्षी 140 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय त्यात 30 महिला आहेत या तीस महिला मध्ये दोन विद्वानी (वीर नारी) प्रशिक्षण पूर्ण केलंय या दोन वीर नारीत बेळगाव शहापूर हट्टीहोळी गल्लीची कन्या भाग्यश्री प्रकाशबापू पाटील यांनी प्रशिक्षण पूर्ण करत लेफ्टनंट ही पदवी मिळवली आहे.
भाग्यश्री या बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बापू पाटील यांच्या कन्या आहेत त्यांचे शिक्षण बेळगावातच झाले आहे. यापूर्वी त्यांनी अमेरिकेत कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले होते.त्यांचा विवाह मूळचे दिल्लीचे असणारे कर्नल विश्वास कुमार यांच्या सोबत झाला होता मात्र गेल्या दीड वर्षांपूर्वी कर्नल विश्वासकुमार यांचं सेवेत असताना आकस्मिक निधन झालं होत त्यांच्या पश्चात तिने खडतर मेहनत प्रचंड जिद्दीच्या जोरावर परीक्षा उतीर्ण होऊन चेन्नई येथील सैन्य दलाच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग यशस्वी रित्या पूर्ण केलं आहे.
सगळे पती आपल्या पत्नी साठी काही न काही तरी सोडून जातात माझ्या पतींनी त्यांचा युनिफॉर्म सोडून गेलेत
माझ्या नवऱ्याचा युनिफॉर्म खुंटीवर टांगून ठेवण्यापेक्षा तो युनिफॉर्म स्वतः घालणें हे माझे स्वप्न पूर्ण होत आहे ती खुश आहे शपथ घेतल्यावर माझे स्वप्न पूर्ण होत आहे असे त्यांनी म्हटलंय. उद्या शनिवारी 9 मार्च रोजी चेन्नई येथील आर्मी ट्रेनिंग मध्ये भाग्यश्री हिला लेफ्टनंट पदाची शपथ दिली जाणार आहे. शुक्रवारी जागतिक महिला दिन आहे या महिला दिनी बेळगावच्या कन्येने मिळवलेले हे यश नक्कीच आदर्शवत असून महिला शक्ती सबलीकरण चालना देणारे आहे. दुःखाला कवटाण्यापेक्षा आपल्या पतिच्या कर्तृत्वासारख कर्तृत्व दाखवून देणं हीच खरी आदरांजली असते. हे दाखवून दिलय.
अश्या या वीर नारीला बेळगाव live कडून एक मानाचा सॅल्युट…
Good