लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आपल्याकडे असलेल्या बंदुकी व इतर शस्त्रे 1973 च्या कलम 144 आणि कलम 144ए अन्वये संबंधित पोलिस स्थानकात जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी केले आहे. लायसन्स धारक शस्त्र बाळगणार्यांनी आपल्या संबंधित पोलिस स्थानकामध्ये आपली शस्त्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर शस्त्र जमा केले नाहीत तर भादवि 1860 च्या कलम 188 नुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा, जिल्हा आणि खाजगी गनमॅन व इतर संस्थांना या कायद्यातून सवलत असून इतर वैयक्तिक परवानाधारकांनी आपल्या परवानाधारक शस्त्रास्त्रांना त्यांना जमा करावे लागणार आहे.
यासाठी जिल्हास्तरीय शस्त्रास्त्र नियंत्रण कमीटीची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः जिल्हाधिकारी या कमिटीचे चेअरमन आहेत. पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार, जिल्हा पोलीस प्रमुख सुधीर कुमार रेड्डी हे सदस्य आणि एसीपी महंतेश्वर जिद्दी कमिटीमध्ये सेक्रेटरी पदावर काम करणार आहेत.कायद्याचे भंग करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.