मराठा क्रांती मोर्चा वेळी टीशर्ट विकण्यावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात क्रांती मोर्चा चे संयोजक प्रकाश मरगाळे यांनाही दोषी ठरवण्यात आले होते. आज वकिलांनी प्रयत्नपूर्वक त्यांना जामीन मिळवून घेतला.
10 हजाराचा बॉण्ड, तेवढ्याच रुपयांचा जामीन, साक्षीदारांना धमकवायचे नाही या अटींवर हा जामीन देण्यात आला आहे.
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझे असा मजकूर लिहिलेले टी शर्ट वीकणाऱ्या शहाजी भोसले नामक तरुणास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याप्रकरणी प्रकाश मरगाळे यांनाही दोषी ठरवून त्यांच्यावरील खटल्याची कारवाई सुरू होती. आज वकील महेश बिर्जे यांनी जामीन मिळवून दिला आहे.