साऱ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कडोली ग्राम पंचायतीची अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मनीषा सागर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कडोली येथे मागील काही महिन्यांपासून अध्यक्षपद रिकामी होते .प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्षा काम पाहत होत्या.मात्र अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. त्यामुळे पुरुष की महिला वर्गाला अध्यक्ष करायचे अशी गोची निर्माण झाली होती.
कडोली ग्राम पंचायत अध्यक्ष ही महिला उमेदवार हवी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. यामुळे महिला उमेदवार करण्यावर भर दिला होता. नागरिकांची मागणी मान्य करत कडोली येथील मनीषा सागर पाटील यांची विनविरोध निवड करण्यात आली आहे त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.
काही महिला सदस्यानी या निवडीसाठी चांगलेच परिश्रम घेतल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक होणार की बिनविरोध याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अध्यक्षपदासाठी गौडाप्पा शिवनगौडा पाटील यांचेही नाव चर्चेत आले होते मात्र महिला सदस्यांच्या पुढाकार घेऊन महिला अध्यक्ष केला आहे.
मनीषा सागर पाटील यांच्यासह 27 सदस्य असून त्यामधील अधिकतर सदस्य मनीषा पाटील यांच्या बाजूने असून त्यांनाच अध्यक्ष करण्याची तयारी सुरू झाली होती. 27 मार्च रोजी ही निवडणूक झाली. यावेळी मनीषा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गावचा विकास हेच ध्येय: मनीषा पाटील
गावातील विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.कोणत्याही कामांना चालना देताना नागरिकांना विश्वासात घेऊन विकास करण्यात येईल त्यामुळे नागरिकांच्या कामासाठी जोरदार प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी बेळगाव live बोलताना दिले