बेळगाव जिल्ह्यात सध्या पीडिओच्या बदल्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. या बदलामुळे अनेक पोडीओची चांगलीच दमछाक उडाली असून त्या बदली रोखण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात जिल्हा पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश यांनी या बदल्या केल्या आहेत.
नूतन कार्यकारी अधिकारी डॉ के व्ही राजेंद्र यांनी 578 ग्राम पंचायत मधील पीडिओ, सेक्रेटरी, सचिव आदी अधिकारी यांची बदली केली आहे. या बदलिचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला आहे ज्यांनी बक्कळ माया गोळा केली आहे त्यांना मात्र संबंधित पंचायत सोडून जाणे नको होतं आहे. त्यामुळे आपली बदली होऊ नये म्हणून अनेकजण जिल्हा पंचायतीच्या पायऱ्या झिजवताना दिसत आहेत.
बेळगाव तालुक्यात इतर तालुक्यातील पीडिओची बदली करण्यात आली आहे मात्र त्याच तालुक्यातील पीडिओना तेथेच त्याच तालुक्यात ठेवण्यात आले आहे. साऱ्या पीडिओना दुसऱ्या तालुक्यात बदली करण्याची गरज निर्माण झाली आहे तेंव्हाच या पीडिओच्या कारनाम्याना रोख बसणार आहे. याचा विचार करून अशा प्रकारे बदली केल्यास अनेकांची चांगलीच गोची होंणार आहे.
तालुक्यातील 36 हुन अधिक पीडिओनच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र काही जण जाण्यास विरोध करत आहेत तर काहीजण बरे झाले असे म्हणून खूषही होत आहेत. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेला बदलीची नामी शक्कल आता यापुढेही अनेकांची पंचायत ठरणार आहे