Sunday, May 5, 2024

/

भाऊबंदकीतून खून झाल्याची फिर्याद

 belgaum

अरुण नंदीहळ्ळी यांचा खून झाल्याने मंगळवारी रात्रभर खळबळ माजली. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिराच मृतदेह पोस्टमार्टेम रूमकडे हलवला आहे. त्यांची पत्नी मंगला यांनी हा खून भाऊबंदकीच्या वादातून झाल्याची फिर्याद दिली आहे.
आपल्या कुटुंबात भाऊ बंदकीचे वाद अनेक वर्षांपासून सुरू होते. यातूनच आपल्या पतीला संपविण्यात आले आहे असे त्यांच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हटले असून भाऊ बंदापैकी काहींवर संशय सुद्धा व्यक्त केला आहे.

रात्री साडे तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार डी सी पी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.

अरुण नंदीहळ्ळी यांच्यावर दुपारी 4 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्या कुणी खून केला त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी अरुण यांच्या कुटुंबाने केली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.