बेळगाव महापालिका आणि पाणी पुरवठा खाते दिवसेंदिवस सुस्त होत चालले आहे मराठा मंदिर समोर गोगटे सर्कल उड्डाण पुलाच्या पायथ्याशी पाणी पुरवठा पाईपलाईन गळती झाल्याने हजारो लिटर वाया जात आहे.
सध्या उन्हाळयाची सुरुवात झाली आहे अश्यात एक थेंब पाणी देखील मोलाचं असताना शहरातील मध्यवर्ती भागात हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे या गळतीमुळे डांबर रस्ता देखील खराब होत आहे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी खड्डा मारून पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्ती केली होती मात्र केवळ एका दिवसात पुन्हा गळती झाली आहे.सतत पाणी झिरपत असल्याने डाम्बर रस्ता खराब होत आहे रहदारीला देखील अडचण निर्माण झाली आहे.
गोगटे सर्कल उड्डाण पुलाच्या मराठा मंदिर जवळील पायथ्याशी असलेल्या स्पीड ब्रेकर वर रंगाच्या पट्ट्या लावणे गरजेचे बनले आहे या स्पीड ब्रेकर वर अनेक अपघात होत आहेत या शिवाय उड्डाण पुलाच्या अगोदर ‘पुढे उड्डाण पुल’असे दिशा दर्शक फलक देखील लावण्याची गरज बनली आहे.
महा पालिका असोत किंवा के यु डब्लू एस असो नागरी समस्या तत्पर सोडवणे गरजेचे आहे पाण्याची नासाडी योग्य नव्हे उन्हाळ्यात एक थेंब पाणी महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगाव live कडे नोंदवली आहे.