Thursday, March 28, 2024

/

पश्चिम बंगालच्या सीमेवर गोळी लागून खानापूरचा जवान शहीद

 belgaum

पश्चिम बंगाल मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 117 व्या बटालियनमध्ये कार्यरत झाड नावगा (ता. खानापूर) येथील जवान गोळी लागल्याने शहीद झाला आहे. आज सकाळी 6 वाजता पश्चिम बंगाल सीमेवर आज झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात  हुतात्म्य प्राप्त झाले आहे.राहुल वसंत शिंदे (वय- 24) असे जवानाचे नाव आहे.

पश्चिम बंगाल येथील सीमेवर आज सकाळी नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी निकराची झुंज देताना राहुल यांना गोळी लागली. यातच त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती  आहे.

बंगाल मध्ये बीएसएफ मध्ये तो सेवेत होता. यावर्षीच त्याचा विवाह जमला होता, सुट्टीचे नियोजन करून येत्या एप्रिल किंव्हा मे मध्ये त्याचा विवाह करण्यात येणार होता पण त्यापूर्वीच दुर्दैवीपणे तो शहीद झाला आहे.

 belgaum

Khanapur jawan bsf
त्याचा भाऊ विवाहित असून तो ही लष्करात आहे. आई वडील शेतकरी आहेत. त्याचा  पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. खासदार अनंतकुमार हेगडे यांच्याशी बोलणी करून पुढील प्रक्रियेसाठी जोतिबा रेमानी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्यापर्यंत पार्थिव गावी आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.