खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी बेळगाव लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.
बेंगलोर येथे गुरुवारी झालेल्या काॅंग्रेस राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत डाॅ अंजली हेमंत निंबाळकर यांचे नाव बेळगाव लोकसभेसाठी चर्चेला आले असताना सर्व मोठ्या नेत्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला मात्र त्यांनी तिकिटाच्या रेस मधून माघार घेतली आहे.
त्यांनी या बैठकीत आपण खानापूरची नवनिर्वाचीत आमदार असून खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असल्याचे स्पष्ट केले होते या शिवाय खानापूर तालुक्याला दिलेला संपूर्ण विकासाचा शब्द पाळण्यास प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.मराठा समाजाला उमेदवारी देण्याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अंजली यांच्या साठी उमेदवारी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
बैठकीला काॅंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या, कर्नाटक प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव, बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.या सगळ्या घडामोडी नंतर कुणाच्या पारड्यात काँग्रेसचे तिकीट पडणार याकडे लक्ष असणार आहे.
Wrong move in a flourishing political career.