विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पांढरीकरण होणार आहे. उपलब्ध रस्त्यांवर पोर्टलँड सिमेंट काँक्रीट घालून रस्त्यावर एक नवा पांढरा थर दिला जाणार आहे.
पांढरीकरण केलेले रस्ते पंधरा ते वीस वर्षे जास्त टिकतात असे नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे पंधरा वर्षे डागडुजी करावी लागत नसल्यामुळे हा मार्ग निवडण्यात आला आहे.
या रस्त्यांना फूटपाथ, पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था ,ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती व इतर कामे केली जाणार आहेत. हे रस्ते जास्त काळ टिकतात आणि कमी डागडुजी करावी लागते आणि पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा फायदे आहेत अशी माहिती मिळते. अमेरिका युरोप आणि आशियातील देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाते .पावसाळ्याच्या पाण्याने रस्त्यावरील थर खराब होत नाही आणि पाणी साचणे तसेच खड्डे पडून डबकी साचने असे होत नाही. त्यामुळे हा प्रयोग केला जाणार आहे.
सर्वप्रथम काँग्रेस रोडवर हे पांढरीकरण होईल. 11 कोटी तुन एपीएमसी ते कंग्राळी रोड केला जाणार असून, बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी बी रोड येथे पाच कोटी खर्च केला जाणार आहे .आणखी 26 कोटी मधून बँक ऑफ इंडिया कॉर्नर, नाथ पै सर्कल, वडगाव सर्कल, नवहिंद सोसायटी, आरपीडी क्रॉस, टिळकवाडी पहिले गेट, गोवावेस सर्कल येथेही रस्ते पांढरे होतील.