भावनिक गुंतागुंत आणि मानसिक त्रास करून घेऊन येळ्ळूर येथील एक मुलाने आपले जीवन संपवले आहे. त्याची चटका लावणारी आत्महत्या घडली आहे.
दिगंबर हणमंत मुचंडी ( वय 15) रा. कलमेश्वर गल्ली असे त्याचे नाव आहे. तो चांगळेश्वरी हायस्कुल यावर्षी दहावीत होता. मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होऊन त्याने गुरुवारी ही आत्महत्या केली आहे.
या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कोणतीही घटना घडल्यास विद्यार्थ्यानी न घाबरता कोणत्याही समस्येला तोंड देणे गरजेचे असून आत्महत्या हा पर्याय नव्हे त्यामुळे कोणत्याही घटनेला सामोरे जायला हवे मात्र आत्महत्या करू नका असे आवाहन करण्यात येत आहे.