Wednesday, November 20, 2024

/

त्याचा मृत्यू चटका लावणारा!

 belgaum

गुरुवार दिनांक 14 रोजी येथील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या टेरेसवरून उडी घेऊन एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केली. एका विद्यार्थिनीने त्याच्या प्रेमाला होकार दिला नाही म्हणून त्याने आपले जीवन संपवले आहे. त्याचा मृत्यू चटका लावणारा असाच आहे .प्रेमात अपयश आले म्हणून वैफल्यग्रस्त झालेल्या विद्यार्थ्याने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी केलेली आत्महत्या अजिबात समर्थनीय नाही, मात्र त्याच्यावर ओढवलेली परिस्थिती दुर्देवी असून अशा परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची गरज आहे.

शिवप्रसाद रंगराव पवार असे त्या अवघ्या अठरा वर्षे वयाच्या मुलाचे नाव होते. तो कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील निगवे गावचा रहिवासी होता मात्र त्याच्या आईचे लहानपणीच निधन झाल्यामुळे आणि वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे आपले आजोबा आत्माराम गवळी यांच्याकडे चिकोडी तालुक्यातील गजबरवाडी येथे राहत होता .लहानपणापासूनच आई आणि वडिलांचे प्रेम न मिळाल्यामुळे मामाच्या घरी राहण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यातच त्याचे शिक्षण सुरू होते .पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दाखल होऊन सिव्हिल शाखेतील चौथ्या सेमिस्टर पर्यंतचे शिक्षण घेतले होते.

त्यातच एका विद्यार्थिनीवर प्रेम जडल्यामुळे आणि विरोध झाल्याने अविचारातून आत्महत्येचा प्रकार केला आहे. एखाद्यावेळी मनासारखी गोष्ट घडली नाही तर आत्महत्येचा विचार करणे अयोग्य आहे, असा विचार मनात आला तर आपले मित्र-मैत्रिणी, शिक्षक, सहकारी विद्यार्थी व पालक यांच्याशी यासंदर्भात बोलणी करून आत्महत्येपासून मन परावृत्त करण्याची गरज आहे. मात्र शिवप्रसाद पवार याने आपल्या पैकी कोणत्याही जवळच्या व्यक्तीला न सांगता आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे इतके दिवस लहानपणापासून त्यांचा सांभाळ केलेल्या त्याच्या आजोळच्या व्यक्ती नाही मोठा धक्का बसला आहे .
आई वडिलांचे छत्र हरपले, वडिलांनी दुसरे लग्न केले त्यामुळे त्यांची साथ न मिळाल्यामुळे तो एकाकी असावा अशी शक्यता असून एकाकीपणातून आत्महत्येसारखा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य वेळी समुपदेशन करण्याची गरज आहे. तरुण कधीही अविचारातून जीवन संपवण्याचा निर्णय घेऊ शकतात याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे .

प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारे चुकीच्या परिस्थितीत आलेल्या विद्यार्थ्यांना हेरून त्यांचे योग्य रीतीने समुपदेशन करण्याची व्यवस्था सरकार व शिक्षण संस्थांनी करायला पाहिजे. याचबरोबरीने डॉक्टरांना वेळोवेळी शाळा आणि कॉलेजमध्ये आमंत्रित करून त्यांच्या आरोग्याची त्यांच्या मानसिक परिस्थितीची काळजी घ्यावी ही गरज निर्माण झालेली आहे. कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.