राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना करणारी पूजा शकुन पांडेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येळ्ळूर मराठी साहित्य संमेलनात झाली आहे.
30 जानेवारी रोजी अलिगढ येथे महात्मा गांधी यांच्या फोटो वर गोळ्या झाडून त्याचे दहन करत नथुराम गोडसे यांच्या जिंदाबाद घोषणा दिल्या होत्या उत्तर प्रदेश सरकारने ठोस कारवाई करत पुन्हा अश्या घटना घडू नये याची खबरदारी सरकारने घ्यावी अशी मागणी देखील ठरावा द्वारे केली आहे.
सीमाभागातील मराठी भाषकांना आणि कर्नाटकातील तमिळ उर्दू भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार त्यांच्या मातृभाषेतुन परिपत्रिके मिळावीत आणि बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी दिल्लीत सुप्रीम कोर्टातील खटल्याचा पाठपुरावा करावा असे महत्वपूर्ण ठराव मांडला.परशराम मोटराचे यांनी हे ठरावं मांडले उपस्थितांनी अनुमोदन दिले.
बेळगाव तालुक्यातील पिकाऊ जमीनी कर्नाटक सरकार संपादित करण्यात येणार आहे कमी मोबदल्यात जमीनी गिळंकृत करणे उताऱ्यावर नो क्रॉप नोंद करणे या कर्नाटक शासनाच्या कृतीचा निषेधाचा ठराव देखील करण्यात आला.
बेळगावसह सीमा भागातील मराठी चळवळ शिक्षण संस्था आणि साहित्य संमेलनात कर्नाटक सरकार कोणतीच सवलत देत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने साहित्य संमेलनाना अनुदान द्यावी अशी मागणी देखील ठरवातून केली.
मूळच्या खडळखाट निपाणी येथील अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी कला सेवेची 75 वर्षे आणि आयुष्याची 90 वर्षे असलेल्या बाबासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा या एन यु जे एम च्या मागणीला पाठिंब्याचा ठराव देखील समत झाला.