येळ्ळूर भागात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे ग्रामीण पोलिसांनी येळ्ळूर गावात पोलीस चौकी सुरू करावी असा ठराव येळ्ळूर ग्राम पंचायतीने मांडला आहे.
येळ्ळूर परिसर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात येते शहरातील वडगांव येथे ग्रामीण पोलीस स्थानक आहे अश्यात येळ्ळूर भागात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात पोलीस चौकी सुरू व्हावी अशी मागणी होत होती त्या नुसार ग्राम पंचायतीने हा ठराव पास केला आहे.
बुधवारी झालेल्या ग्राम पंचायतीच्या बैठकीत हा ठराव पास करण्यात आला असून ग्राम पंचायत सदस्य राजू उघाडे यांनी ठराव मांडला.गेल्या काही दिवसांपूर्वी येळ्ळूर गावात भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे या शिवाय गांजा आणि इतर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या युवकांच्या संख्येत देखील कमालीची वाढ झाली आहे अश्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी गावात पोलीस चौकी व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे.
येळ्ळूर भागात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्राम पंचायतीच्या ठरावाची प्रत पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांना देण्यात येणार आहे.गावातील लोकांच्या समस्या आणि विकासा बरोबर कायदा सुव्यवस्था ठेवण्यात देखील सर्व सदस्यांनी पुढाकार घेतलेला आहे.केवळ ठराव न करता उपयुक्तां कडे पोलीस चौकीसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.