Tuesday, November 19, 2024

/

मराठा युवक संघालाच मराठीचे वावडे का?

 belgaum

फक्त नावाला मराठा युवक संघ आणि मराठीचे वावडे असा प्रकार बेळगाव शहरात दिसून येत आहे. बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करून त्या स्पर्धेच्या व्यासपीठावर तसेच आमंत्रणपत्रिका छापताना कायम इंग्रजीला स्थान देण्यावरून मराठी युवक संघ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याबद्दल मराठी भाषिकात तीव्र नाराजी असून अनेकांनी बेळगाव live कडे ही नाराजी बोलून दाखवली.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांना फोन केला तर संघ स्थापन केल्यापासून आम्ही नेहमीच इंग्रजी भाषेतूनच आमंत्रण पत्रिका छापतो त्यामुळे मराठी मधून छापण्याचा प्रश्न येत नाही तुम्ही आमच्या सेक्रेटरी ना विचारा असे उत्तर दिले.
सेक्रेटरींनी याबद्दल माफी मागितली असून मराठीत आमंत्रण पत्रिका प्रिंट करतो असे सांगितल्यावर बाळासाहेब काकतकर यांनी ठीक आहे एवढेच म्हटले.

Maratha yuvak sangh
मराठी आणि मराठी भाषिकांना व्यासपीठ देण्यासाठी व बळ देण्यासाठी मराठा युवक संघ स्थापन करण्यात आला मात्र सध्याचे कार्यकारी मंडळ त्यातील राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी मराठा युवक संघाचे वापर करू लागले आहेत अशी चर्चा नेहमीच होत असते. संघातर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे घेतल्या जातात पण या ठिकाणी मराठीला स्थान न दिल्यामुळे संघाबद्दल नाराजी आहे.
संघाने तातडीने आपली आमंत्रण पत्रिका मराठी मध्ये छापावी व बॅनर मराठीत लावावा अशी मागणी होत आहे .
काही कन्नड लोकांना संघात स्थान देऊन ते सांगतील तसेच वागण्याचा प्रकार अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी सुरू केला असून त्याबद्दल नाराजी आहे.

या संघाची बेळगाव श्री 2019 स्पर्धा मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी मराठा मंदिर सभागृह येथे होणार आहे या स्पर्धेचे आमंत्रण पत्रक इंग्रजीमधून झाले आहे त्यामुळे ही नाराजी पसरली आहे या संदर्भात जनरल सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल यांच्याशी संपर्क केला असता प्रतिक्रिया देण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही मात्र यापुढे अशी चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.