हिंडलगा पेट्रोल पंप जवळ आढळून आलेल्या एक महिला व तिच्या लहान मुलास जायंट्स सखीच्या अध्यक्षा नम्रता महागावकर आणि त्यांच्या सहकारी सखींनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करून स्तुत्य कार्य केलं आहे.
आज सकाळी ती महिला सापडली होती, ती मानसिक असल्याने तिला आपला थांगपत्ता सांगता आला नाही. तिच्याजवळ असलेले मुलंही भुकेलेले होते, तेंव्हा त्यांच्या पोटाची व्यवस्था करून सिव्हिल मध्ये आणण्यात आले.
यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचार करण्यासाठी मदत केली.
त्या महिलेवर अधिक उपचार केले जाणार आहेत.