गोवर हा लहान मुलांमध्ये आढळणारा, लागण होणारा आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठते. निरोगी मुलांना याचा फारसा त्रास होत नाही पण मूल जर कुपोषित असेल तर गोवारामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात व मृत्यूही येऊ शकतो.
लक्षणे
डोळे खूप लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला तसेच तोंडावर, गालावर लालसर ठिपके येतात व पुरळ येते. हे ठिपके म्हणजेच गोवर ओळखण्याचे हमखास लक्षण आहे. ताप हळू हळू वाढत जातो व पूर्ण अंगभर कानाच्यामागे चेहरा, मान, छाती, पोट याप्रमाणे पुरळ येते व शेवटी हातापायावर पसरते पण कधीकधी पुरळ हातापायावर यायच्या आधीच गोवर कमी होतो. गोवराचे पुरळ ज्याप्रमाणे येते. त्याचप्रमाणे म्हणजे वरून खाली नाहीसे होते. तोंडातील पुरळामुळे भूक मंदावते. खोकला मात्र थोडे दिवस टिकतो. ताप उतरून नंतर पुन्हा आला किंवा पुरळ पायापर्यंत गेल्यावर सुद्धा ताप कमी झाला नाही तर त्यातूनच पुढे न्यूमोनिया किंवा इतर आजार होऊ शकतात.
उपचार
गोवरची लस देणे हा प्रतिबंधक उपाय आहे. ही लस सरकारी दवाखान्यात मिळते. ही लस मूल ९ महिन्यांचे असतांना देतात. लस टोचल्यावर थोडा ताप, अंग लाल होते व पुरळ येते. गोवर झाल्यास त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.
होमिओपॅथी
या उपचारांनी हा विकार पुर्ण बरा होतो