अनेकांना सेल्फीचा मोह आवरत नसतो कधीही कुठेही सेल्फी घेणारे अनेक जण असतात अश्याना उद्यानात सेल्फी काढण्यासाठी खास पॉईंट बनवण्यात आला आहे. होय ..बेळगावातील बुधवार पेठ टिळकवाडी येथील उद्यानात खास सेल्फी पॉईंट बनवण्यात आला असून असा पॉईंट असणारे हे शहरातील पहिलं उद्यान असणार आहे. वेगवेगळ्या रंगाची फुलांची झाडे एकत्रित करून हा सेल्फी पॉईंट बनवला असून लवकरंच या गार्डनचे लोकार्पण होणार आहे.
स्मार्ट सिटी निधीतून तब्बल 96 लाख रुपये खर्चून या उद्यानाचा कायापालट होत आहे. याचे काम सिव्हिल कंत्राटदार श्रीधर नागोजीचे करत असून गार्डनिंगचे काम कृष्णा चव्हाण करत आहेत.
*या उद्यानात काय काय असेल*
या उद्यानात वॉकींग जॉगिंग ट्रॅक बनवला असून 70 टक्के हुन अधिक भागाचे हिरवळीकरण झाले आहे इतकेच काय तर 70 नमुन्यांच्या फुलांच्या झाडांनी सजलेल्या गार्डन मध्ये चारी बाजूनी ख्रिसमस झाडे ग्रॅनाईट च्या सजावटीने बनवली जात आहेत. लँड स्केपिंग साठी हे उद्यान एक युनिक कन्सेप्ट असणार आहे.स्वच्छतागृह एका कोपऱ्यात आहे. योगा डेक बनवला आहे कारंजा उकृष्ट बनवला जात आहे.बांबू चा वापर देखील चारी बाजूनी आहे त्यामुळे बाहेरचा आवाज आतमध्ये येत नाही. सुंदर इलेक्ट्रॉनिक पोल घातले जात असून सजावट केली जात आहे अशी माहिती स्मार्ट सिटी अभियंत्या रुकिया हडलगे यांनी दिली.
स्मार्ट शहरासाठी आम्ही स्मार्ट गार्डन देण्याचा प्रयत्न केलाय यात जॉगिंग ट्रॅक मेडिटेशन डेक बनवले आहेत. केवळ तरुणच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांना आवडेल, त्यांना या उद्यानात वेळ घालता यावा हे ध्यानात ठेऊन आम्ही गार्डन बनवलं आहे असे मत गार्डनर कृष्णा चव्हाण यांनी व्यक्त केलंय.
शर्कत पार्क बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरातील एक सुंदर आकर्षक असे उद्यान आहे त्या पाठोपाठ टिळकवाडी शुक्रवार पेठ येथील उद्यान बेळगावकरांचे मनोरंजन करेल आणि काहीकाळ सुखावा देईल यात शंका नसेल.