बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी इब्राहिम मैगुर यानव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मनपा आयुक्त म्हणून काम बघत असलेले शशिधर कुरेर यांची बदली झाली असून सोमवारपासून इब्राहिम मैगुर पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे .
शशिधर कुरेर यांच्या बदलीच्या चर्चेचा जोर होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली होणार अशी चर्चा होती शनिवारी याबद्दलचा आदेश दाखल झाला.
मैगुर हे धारवाड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम बघत होते आता ते बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त पदाचा भार स्वीकारणार आहेत. तैगुर यांच्या नियुक्ती मुळे कुरेर यांची बेळगाव मनपा इनिंग संपणार आहे.