Friday, May 3, 2024

/

देशद्रोही पोस्ट टाकणाऱ्या युवतीच्या घरावर हल्ला

 belgaum

पुलवामा अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशातील सर्व घटकातून श्रद्धांजली वहात असताना सौन्दत्ती येथील उर्दू शिक्षिकेने देश द्रोही पोस्ट टाकल्याने तिच्यावर गुन्हा नोंद झाला आहे तर  या कृत्या विरोधात चिडलेल्या युवकांनी तिच्या घरावर दगडफेक करत घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट टाकल्या प्रकरणी सौन्दत्ती  येथील कडबी शिवापूर गावच्या युवतीवर आय पी सी 153 अ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.जिलेका ममदापुर असे या युवतीचे नाव असून तिला मुरगोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jileka

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेस बुक व्हाट्स अप्पवर पाक ध्वज पाकिस्तान की जय हो  असा देश विरोधी मेसेज टाकला होता. व्हाट्स अप चा डी पी देखील देश विरोधी ठेवला होता. जिलेका ही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते.

घराला आग लावण्याचा प्रयत्न

House burnt

सदर देश विरोधी पोस्ट सोशल मीडियावर वायरल होताच संतप्त युवकांनी ग्रामस्थांनी सदर युवतीच्या घरावर दगडफेक करत घर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला या घटने नंतर शनिवारी रात्री यरगट्टी जवळ रस्त्यावर टायर पेटवून राग व्यक्त केला होता.

दरम्यान देश विरोधी पोस्ट टाकण्याच्या विरोधात आज रविवारी मुरगोड बंद करण्यात आले आहे तर त्या शिक्षिकेचे घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुधीर रेड्डी यांनी माध्यमांना दिलीय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.