कोणालाही विश्वसात न घेता आणि कोणतीही बैठक न घेता अध्यक्ष आणि काही अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या सदस्यांची निवड केली आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नाही किंवा कोणतीही बैठक न घेता अनधिकृत ही निवड करण्यात का आली? असा प्रश्न उपस्थित करून अध्यक्ष आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
तालुका पंचायत ची सर्वसाधारण बैठक गुरुवारी पार पडली. अध्यक्षस्थानी ता प चे अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मारुती सनदी,कार्यकारी अधिकारी पदमजा पाटील, तहसीलदार मंजुळा नाईक उपस्थित होते. स्थायी समितीच्या निवडीबाबत कोणालाही विश्वसात न घेता ही निवड करण्यात आल्याने या समिती रद्द करून पुन्हा बैठक घेऊन त्याची निवड करावी अशी मागणी करण्यात आली.
सध्या रिंगरोडबाबतच्या हालचाली जोरदार असून याला विरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी दि 28 रोजी भव्य आंदोलन करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत तालुका पंचायत सभागृहात रिंगरोडला विरोध म्हणून ठराव संमत करण्यात आला . यावेळी साऱ्यांनीच याला अनुमोदन देऊन ठराव मंजूर करण्यात आला आहे.
याचबरोबरीने तालुक्यातील अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. या शाळांची दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीला तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, रावजी पाटील, मनीषा पालेकर, लक्ष्मी मेत्री, यल्लप्पा कोळेकर, भीमा नायक, आदी अधिकारी उपस्थित होते