बेळगाव रेल्वे स्थानक देशातील ग्रेड तीन चे असून या स्टेशनवर दररोज 15 हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात.1887 साली निर्माण करण्यात आलेले स्थानक असून 130 वर्षा पूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती.मिरज लोंढा दुपदरीकरण कामाच्या निधीतून 12 कोटी खर्चून इमारत बांधली जाणार आहे. अभियंते बकुळ जोशी यांनी या इमारतीचा प्रारूप आराखडा बनवला आहे.
अश्या असणार सुविधा
मुक्त वातावरणात फिरण्यासाठी फूट पाथ
मॉडर्न बुकिंग काउंटर
एकझुकेटीव्ह लॉंज
महिला पुरुष प्रवाश्यांना प्रतीक्षा गृह
हॉटेल
विश्रांती गृह
सरकता जिना
या शिवाय प्लॅट फार्म नंबर 1 रुंदीकरण केल जाणारअसून यावरून 2 व 3 प्लॅट फार्म वर जाण्यासाठी पादचारी पूल बनवले जाणार वाढत्या प्रवाश्यांची संख्या लक्षात घेऊन दक्षिण बाजूनी प्रवेशद्वार बनवले जाणार आहे गुडस शेड रोड माल वाहतुकीचे शेड सांबरा येथे हलवले जाणार आहे.