बेळगाव लाइव्ह या बेळगावच्या एकमेव मराठी, नंबर वन न्यूज वेब पोर्टलने खानापूर लक्ष्मी यात्रेचे कव्हरेज अतिशय उल्लेखनीय केले असे कौतुक करून खानापूर यात्रा कमिटीने बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा यथोचित सन्मान केला आहे.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष नामदेव गुरव, उपाध्यक्ष राहुल यल्लाप्पा सावंत ,खजिनदार राजेंद्र चित्रगार, सेक्रेटरी यशवंत लक्ष्मण बिर्जे आणि उपसचिव अरुण होसमनी यांनी सत्कार केला. लक्ष्मी यात्रेच्या मंडपामध्ये खास आमंत्रित करून हा सन्मान करण्यात आला आहे.
बेळगाव live ने खानापूर च्या महालक्ष्मी यात्रेला संपूर्ण जगात पोचवले. यात्रेला येऊ न शकलेल्या जगभरातील खानापूर वासियांसाठी यात्रा त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध केली. याबद्दल आभार मानून यापुढील काळात खानापूर आणि परिसरातील राजकीय सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्याची विनंती करण्यात आली आहे.
बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी याबद्दल खानापूर यात्रा कमिटीचे आभार मानले असून बातम्यांना प्रसिद्धी देणे व बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे बेळगाव live चे पहिले कर्तव्य असून या कामासाठी केलेल्या सत्काराने भारावून गेलो असल्याचे सांगितले.यापुढील काळात खानापुर परिसरातील बातम्या सातत्याने बेळगाव live माध्यमातून प्रसिद्धीस दिल्या जातील अशी ग्वाही बेळगोजी यांनी दिली आहे.