Wednesday, December 25, 2024

/

बार असोसिएशन तर्फे दहशतवादी हल्ल्याचा निषेध

 belgaum

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये काल झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 हून अधिक जवान हुतात्मा झाले. या दहशतवादी हल्ल्याचा बेळगाव बार असोसिएशनने तीव्र शब्दात निषेध केला असून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे .

शुक्रवारी 15 रोजी सकाळी विशेष बैठकीचे आयोजन करून बेळगाव बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली .आतंकवादी हल्ला भ्याडपणाचे लक्षण आहे या शब्दात निषेध करण्यात आला आहे. बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व वकील वर्ग आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उध्या पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कामकाज बंद केली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.