एकीकडे सगळे जण पुलवामा घटनेचा निषेध करत जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी करत असताना भारतीय सेनेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या युवकांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था देखील बेळगावात आहेत.मिलीटरी भरतीसाठी आलेल्या अश्या युवकांना मदत करण्याचे काम बापट गल्लीतील कालिकादेवी मंडळाने केलंय.
मिलिटरी भर्ती साठी आलेल्या गरजू युवकांना बिस्किटे आणि फराळ म्हणून केळी वितरण करण्यात इतर संघटना समोर वेगळा आदर्श घालून दिलाय.गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव live ‘सैन्य भरतील हजारो युवक बेळगावात दाखल’ अशी बातमी दिली होती त्या बातमीत भरती साठी आलेल्या जवानांची व्यथा मांडली होती त्याचीच दखल घेत या मंडळाने हे कार्य केले आहे.
16 ते 23 फेब्रुवारी पर्यंत बेळगावातील मराठा रेजिमेंट मध्ये ‘महार रेजिमेंट’ साठी भर्ती सुरू आहे तांत्रिक आणि सैनिक पदा करीता ही भर्ती प्रक्रिया सुरू असून यात सहभागी होण्यासाठी देशातील विविध राज्यांतून युवक बेळगावला येत आहेत.
नेमकं वेळा पत्रक माहीत नसल्याने अनेक युवक अगोदरच बेळगावात दाखल झाले आहेत त्यांना लॉज मध्ये किंवा इतर ठिकाणी राहणे परवडत नसल्याने रेल्वे स्टेशन किंवा इतरत्र ठिकाणी हे युवक रहात आहेत. गरजू युवकांना शोधून कालिकादेवी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फराळ दिला आहे.एकीकडे मराठी मातृभाषेसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या मंडळाने सैन्य भरती साठी आलेल्या युवकांना मदत करून वेगळा संदेश दिला आहे.
जवळपास सात ते आठ हजार युवक या भरतीत सहभागी होण्यासाठी आले असून शौर्य चौका जवळील मिलीटरी डेअरी फार्म मध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.मिलीटरी च्या वतीने या युवकांसाठी स्वच्छता गृहाची सोय करण्यात आली आहे. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील केसरकर, महेश पावले, अंकुश केसरकर, सुनील मुरकुटे, दिगंबर किल्लेकर, शुभम मोरे आदी उपस्थित होते.