पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायू सेनेने पाक व्याप्त काश्मिरात एअर सर्जिकल स्ट्राइक करत अनेक अतिरेकी तळं उध्वस्त केल्याच्या कारवाईचे बेळगावात जल्लोषी स्वागत करण्यात आलं आहे. एअर स्ट्राइकचे स्वागत आणि हल्ल्याचा विजयोत्सव वायू सेनेच्या पायलट साहसाचें कौतुक यावेळी करण्यात आले.
सकाळी सकाळी वृत्त वाहिन्यातून पी ओ के मध्ये भारतीय सैन्याने विमानी हल्ला करून पुलवामा घटनेचा बदला घेतल्याची माहिती समजताच फटाके वाजवत मिठाई वाटप करत या कारवाईचे स्वागत करण्यात आलं.दक्षिण काशी कपीलेश्वर मंदिर ट्रष्ट कमिटीच्या वतीने हा जल्लोष करण्यात आला.
भारतीय जवानांनी आणि इंडियन एअर फोर्स च्या मिराज 2000 ही 12 विमाने चालवत हल्ला करणाऱ्या त्या 12 पायलट व इतर जवानांच्या शौर्याला आम्ही नमन करतो भारतीय सैन्य दलाच्या या बहादूरी मुळे हे शक्य झालं म्हणून आम्ही विजयोत्सव साजरा केला असे मत मंदिर ट्रष्ट समितीचे सदस्य अभिजित चव्हाण यांनी बेळगाव live शी बोलताना मांडले.