Friday, January 10, 2025

/

आशियाई रोलबॉल स्पर्धेत भारताला दुहेरी मुकुट – बंगालादेश उपविजेते

 belgaum

श्वेता कदम, त्रिभुवन पटेल विजयाचे शिल्पकार :विद्यमान विजेत्या भारतीय पुरुष व महिला संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत कडव्या बंगलादेश संघाला नमवीत तिसऱ्या आशियाई रोलबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला. श्वेता कदम व त्रिभुवन पटेल भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या स्पर्धेत महिला गटात सर्वाधिक गोल श्वेता कदम (भारत) तर पुरुष गटात ह्रीदोय हुसैन (बंगलादेश), सर्वोत्तम खेळाडू विजय बारला (भारत), उर्वशी शर्मा (भारत), सर्वोत्तम गोलरक्षक दिलशान (श्रीलंका), रुची राजपूत (भारत) यांना देण्यात आला.

महिलांच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने अटीतटीच्या लढतीत १-३ अशा पिछाडीवरून बांगलादेश संघाला ४-३ असे पराभूत केले. भारतीय संघाच्या श्वेता कदमने निर्णायक क्षणी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करताना ३ गोल नोंदविले. तर उर्वशी शर्माने १ गोल करताना विजयास हातभार लावला. बंगलादेश संघाकडून ब्रीष्टी राणी रे हिने, इसरत जहान रोमा, नासिबा मेहमूद यांनी प्रत्येकी १ गोल केला.

Roll ball

पुरुषांच्या अंतिम लढतीत भारताने बंगलादेश संघाला १०-५ असा सहज पराभव करताना विजेतेपद राखले. भारताच्या त्रिभुवन पटेलने ४ गोल तर शंकर राऊत, कर्णधार आकाश गणेशवाडे, विजय बारला, यांनी प्रत्येकी २ गोल केले.

तत्पूर्वी पहिल्या उपांत्य लढतीत भारताने श्रीलंका संघाला ६-१ तर बंगलादेश संघाने नेपाळ संघाला ८-२ असे पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नेपाळ संघाने श्रीलंका संघाला ४-३ असे पराभूत केले. महिलांच्या गटात गुणांच्या आधारे श्रीलंका संघाने तिसरे स्थान राखले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला खासदार सुरेश अंगडी, शाहपूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशाफिरी, कन्नड अभिनेते आर्यन संतोष, भारतीय रोलबॉल संघाचे अध्यक्ष विनीत कुबेर, उपाध्यक्ष मनोज यादव, रोलबॉल खेळाचे जनक व भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे, शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक, सचिव रमेश चिंडक, सुरेश चिंडक, संगीता चिंडक, मल्लेश चौगुले, हिसकॉम अधिकारी अश्विन शिंदे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ. हिम्मतसिंग कनावत, रमेश सिंग, सुर्यदत्त जोशी, प्रताप पगार, अर्चना कौर, सुमनलता, चंदेश्वर कुमार, भूपती, सुखलंग डकार ( सर्व भारत), असिफुल हसन (बंगलादेश), बदर नसेर (ओमान), बीरकृष्णा महार्जन (नेपाळ), मोहन सुब्बा (भूटान), अहमद अवाद (सौदी अरेबिया), मोहम्मद रिल्वान (मालदीव), सुलतान अली सिनाई (ओमान), देबाशिष पट्टनायक (कंबोडिया), त्रिवेंद्रम (श्रीलंका) यांनी काम पाहिले.

विजेत्या भारतीय पुरुष संघात आकाश गणेशवाडे (कर्णधार, महाराष्ट्र ), शुभम चव्हाण, शंकर राऊत (महाराष्ट्र), भानू खजुरिया (जम्मू-काश्मीर), विजय बारला (राजस्थान), चेतन डोंडा (गुजरात), त्रिभुवन पटेल (उत्तर प्रदेश), चमन जैन (छत्तीसगड), मनदीप सिंग (पंजाब), निखिल चिंडक (कर्नाटक), पवन कुमार (दिल्ली) आणि मोनू गुप्ता (झारखंड) तर महिला संघात रितिका जालानी (कर्णधार, राजस्थान), श्वेता कदम (महाराष्ट्र), अंकिता चोपडा, सुविधा सरीन , रुही राजपूत (जम्मू-काश्मीर), मनीषा प्रधान (आसाम), सृष्टी वर्मा (छत्तीसगड), सावलिया मानसी, पूर्वी उरवाहा, भकर जान्हवी (गुजरात), महिमाश्री सी. एम (तमिळनाडु), आणि उर्वशी शर्मा (राजस्थान) यांचा समावेश होता. भारतीय पुरुष संघाला मधू शर्मा (जम्मू-काश्मीर) तर महिला संघाला केतन त्रिवेदी (गुजरात) यांचे मार्गदर्शन लाभले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.