तालुका पंचायत ची सर्वसाधारण बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. मात्र ही बैठक कोरम अभावी रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांच्या मनमानी कारभाराबद्दल नाराजीचा सूर पुन्हा एकदा उमटला आहे.
नूतन स्थायी समित्यांची निवड आपल्या मानमानीपणे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समितीत अध्यक्षांनी आपल्याच मर्जीतील सदस्याना या समितीत स्थान दिले आहे. त्यामुळे अनेकांतुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काही सदस्य बैठक हाणून पाडणार आहेत.
मागील काही बैठकी शांततेत पार पडल्या होत्या. अध्यक्षच अडचणीत येणार अशी भीती असल्याने साऱ्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अध्यक्षांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे
बैठकीच्या सुरुवातीलाच अध्यक्षांचा चांगलाच खरपूस समाचार घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जर ही निवड रद्द करून दुसर्या सदस्यांना या समितीत स्थान देण्यात आले नाही तर अनेक सदस्य सभात्याग करणार असल्याची माहिती मिळाली आहे