पहिल्या पावसाच्या दणक्यालाच गोगटे सर्कल उड्डाण पुलाचे फुटपाथ खचले. गेल्यावर्षी 25 डिसेंबरला ब्रिजचे उदघाटन झाले होते केवळ सहा महिन्यांत पहिल्या पावसाच्या दणक्याला उड्डाण पुलाचे फुटपाथ खचले आहे.
ही बातमी सर्वप्रथम बेळगाव live ने ब्रेक केली सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान न्यूज अपडेट केली असता या बातमीचा इम्पॅक्ट अवघ्या तीन तासात पाहायला मिळाला आहे. नैऋत्य रेल्वेच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी ब्रिजची पाहणी करून अहवाल मागवला आहे.
रात्री साडे नऊच्या दरम्यान भर पावसात खचलेल्या फुटपाथ आणि रस्त्याची पहाणी केली दरम्यान सदर अधिकारी या फुटपाथ अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार आहेत.केवळ फुटपाथ खचले असून ब्रिजला कोणताही धोका नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रेल्वे अधिकारी पहाणी करायच्या वेळेलाच सिटीझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर तेथून जात होते त्यानींही यावेळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
25 डिसेंम्बर 2018 रोजी उदघाटन घिसाड घाईने करण्यात आले त्यामुळे अनेकदा रस्ता खचला होता आता फूटपाथ खचले आहे. इंग्रजांनी बनवलेला दीडशे वर्षाचा ब्रिज कसा होता?केवळ सहा महिन्यांपूर्वी बनवलेला हा ब्रिज कसा याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत.या फुटपाथ खचण्याला गोगटे सर्कल उड्डाण पुलाचे काम गडबडीत करायला लावणारे लोक प्रतिनिधी जबाबदार की ठेकेदार जबाबदार? हा प्रश्न नक्कीच उत्पन्न होत असून रेल्वे अधिकारी यावर लवकर उत्तर शोधतील ही अपेक्षा आहे.आज फुटपाथ खचले उद्या ब्रिजही खचेल, बेळगावकरांच्या असुरक्षीततेला जबाबदार कोण? हा मुद्दा महत्वाचा आहे.