Tuesday, April 30, 2024

/

‘इस्कॉन रथयात्रा पर्यावरण प्रदूषण मुक्त’:भक्ती रसामृत महाराज

 belgaum

‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने येत्या 2 व 3 फेब्रुवारी रोजी 21वी भगवान जगन्नाथ रथयात्रा संपन्न होत आहे’ अशी माहिती इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली
‘ इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी सुरू केलेल्या या चळवळीने आता जगभरात विशाल स्वरुप धारण केले आहे .अध्यात्मिक क्रांतीचा हा उत्सव बेळगावात गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लाखाहून अधिक भक्तगण सहभागी होतात .2 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून रथयात्रेस प्रारंभ होणार असून शहराच्या विविध भागात फिरून ही रथयात्रा इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस पोहचेल. देशभरातून आलेले हजारो आबालवृद्ध स्त्री-पुरुष या रथयात्रा महोत्सवात सहभागी होतील असे ते म्हणाले

रथयात्रेबद्दल अधिक माहिती देताना स्वामी महाराज यांनी सांगितले की ‘जनतेमध्ये अध्यात्मिक प्रेरणा विकसित व्हावी या उद्देशाने ही रथयात्रा सुरू आहे .या महोत्सवात पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिकवर पूर्णतः बंदी घालण्यात आली असून स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला आहे .रथयात्रेत सहभागी होणाऱ्या हजारो भक्तांना जागोजागी फलाहार आणि रस व पाणी दिले जाते.

शहरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून रथासमोर इस्कॉनचे एक पथक अल्प वेळेत आकर्षक अशा रांगोळ्या रेखाटणार आहे. शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी बैलजोडी स्पर्धेचे आयोजन केले जाते ज्यामध्ये सुशोभित केलेल्या अनेक बैलजोड्या सहभागी होतात त्यांचे क्रमांक काढून त्यांना पुरस्कार देण्याची प्रथा इस्कॉन ने गेल्या अनेक वर्षापासून चालू ठेवली आहे असेही ते म्हणाले.

 belgaum

Belgaum iskcon

या रथयात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य या रथयात्रेत तरुण वर्गाचा मोठा सहभाग आहे देशाचे भवितव्य उज्ज्वल करणार्‍या तरुणांना यात्रेद्वारे चांगला मार्ग दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहितीही महाराज यांनी दिली.
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पहिल्या दिवशी रात्री आणि दुसऱ्या दिवशी रात्री येणाऱ्या प्रत्येकाला पूर्ण भोजनाची व्यवस्था केली जाते त्याबरोबरच ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने; नाट्य लीला ,स्लाईड शो याबरोबरच भजन -कीर्तन यांचाही समावेश असल्याने हे दोन दिवस बेळगावकरांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत असे ते म्हणाले. रथयात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या वैष्णव यदनमधे 60 हून अधिक कुटुंबे सहभागी होणार आहेत.

वातावरण शुद्धीकरणाचा हा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. *इस्कॉनच्या तीन गोशाळा* इस्कॉन च्या वतीने बेळगाव परिसरात सध्या तीन गोशाला चालविल्या जात आहेत त्यामध्ये टिळकवाडी बेळगाव येथील मंदिर परिसरात असलेली एक गोशाळा, हूलमनी येथे असलेली दुसरी आणि गोकुलधाम चिखले येथे असलेली तिसरी गोशाळा.गोशाळा मध्ये अनेक गाई आहेत यांच्या साह्याने अनेक औषधे बनवली जातात अशी माहिती त्यांनी दिली पत्रकार परिषदेप्रसंगी अध्यक्ष बाल किशन भट्टड ,सेक्रेटरी श्वेत निताई दास ,नारायण गौरंगा खजिनदार व जनसंपर्क अधिकारी अनंत लाड याचबरोबर नंद महाराज अरविंद कोल्हापूर ,प्रदीप उंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.