उचगाव ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या केवळ पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा रस्ता महत्वाचा असून या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्यावर केवळ डागडुजी करण्यात येत असल्याने खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी रस्त्यावर विखातून पडली आहे. त्यामुळे अपघाताना आमंत्रण मिळत आहे. याचा वापर करून या सम्पूर्ण रस्त्यावर डांबर घाला अशी मागणी होत आहे
उचगाव ते महाराष्ट्र हद्दी पर्यंत एकूण सहा किलो मीटरचा हा रस्ता आहे. गडहिंग्लज, नेसरी, आजरा, कोवाड आदी ठिकाणच्या गावातील नागरिक याच रस्त्यावरून प्रवास करताना दिसतात. मात्र हा रास्ता कुचकामी असून अनेक अपघात या रस्त्यावर घडत आहे. त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या करण्यात येत असलेल्या रस्त्यावर डांबर कमी वापरण्यात आला आहे. त्यामुळे करण्यात आलेली डागडुजी खराब होत असून येथील कंत्राटदरही पैसे कमविण्यासाठी अनेकांचा बळी टांगणीला ठेवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा सारा रस्ता उखरून काढुन नवीन डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे