Tuesday, April 30, 2024

/

शेतकऱ्यांचा आंदोलनाला राजकारणी आणि अधिकाऱ्यांचा ठेंगा

 belgaum

उसाला योग्य हमीभाव द्यावा आणि थकीत बिलासाठी मागील अनेक महिन्यापासून आंदोलनावर आंदोलने केली. रस्त्यावर उतरून आणि जमिनीवर ठिया आंदोलने करून आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणा करणाऱ्या शेतकऱ्यांना राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी ठेंगाच दाखविल्याचे दिसून येत आहे.

बेळगाव जिल्हा हा साखरेचे भरपूर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाणे आहेत. मात्र या जिल्ह्यातील सर्वात जास्त उसबिल थकीत आहे. अधिवेशन कालात शेतकऱ्यानि जोरदार आंदोलने केली आणि सरकारचे लक्ष आपल्याकडे वळून घेतले.

Farmers strike

 belgaum

(फोटो संग्रहित- शेतकरी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करताना)

यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकार्यांना ज्या साखर कारखाण्याचे बिले अदा केली नाहीत अशा कारखान्यांना नोटीस बजावन्याचे आदेश दिले. यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व साखर करखान्याच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन बिले अदा करण्याचा आदेह दिला. काहींसाखर कारखाने बिले देण्यास सुरुवात केली तरी अजूनही बऱ्याच कारखान्यांनी बिले देण्यास सुरुवात केली नाही. यामुळे दिलेल्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान शेतकरी आणि कारखंदारांच्या भांडणात नुकसान मात्र शेतकर्यांचेच झाले आहे. बेळगाव परिसरात अजुनाही काही शेतकऱ्यांचे ऊस घेऊन गेले नाहीत. त्यामुळे उसाला तुरे आलेत आणि वजनही कमी झाला आहे. या साऱ्या प्रकारांमुळे अधिकारी आणि साखर कारखानदार निवांत आणि शेतकरी वाऱ्यावर अशी अवस्था झाली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.